40 हजार कोटींचा निधी केंद्राकडे वळवण्यासाठी फडणवीस झाले मुख्यमंत्री, भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ananth-kumar-hegde

महाराष्ट्र विकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असताना भाजपनं अजित पवार यांना सोबत घेत एका रात्रीत सरकार स्थापन करून सार्‍यांनाच धक्का दिला होता. मात्र आता असं करण्यामागे महाराष्ट्राच्या हक्काचे 40 हजार कोटी रुपये नव्या सरकारला वापरता येऊ नये म्हणून केंद्राला परत करण्याचा डाव होता असा गौप्यस्फोट भाजप खासदारानंच केला आहे.

आजतक आणि इंडिया टुडेने दिल्या वृत्तानुसार भाजप खासदार अनंत कुमार हेगडे म्हणाले की, “राज्यात आपला माणूस (देवेंद्र फडणवीस) 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक का केले? आमच्याकडे बहुमत नसताना त्यांनी शपथ कशी काय घेतली हा प्रश्न सर्वजण विचारत आहेत.”

हेगडे म्हणाले की “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्राचा 40 हजार कोटींचा निधी होता. जर राज्यात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर हा निधी त्यांच्याकडे गेला असता.” या निधीचा सरकारने गैरवापर केला असता असे म्हणत हेगडे यांनी तारे तोडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला हा निधी विकासकामासाठी वापरता येऊ नये म्हणून हे सारे कुभांड रचण्यात आले होते असेही हेगडे म्हणाले.

हे पैसे केंद्राकडे वळते करण्यासाठी फडणवीस यांना 15 तासांचा अवधी लागला असे हेगडे म्हणाले. निधी वाचवण्यासाठी हे सर्व राजकीय नाट्य  केला असे दावाही त्यांनी केला.