Photo – मेस्सी-रोनाल्डो नाही तर ‘हा’ आहे जगातील श्रीमंत खेळाडू, 1300 अब्जची संपत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉलपटू कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही लिओनल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो ही नावे घ्या. पण हे चूक असून जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळाडू फ्रॅक बोल्किया (Faiq Bolkiah) असून तो फक्त 23 वर्षाचा आहे.

फ्रॅक बोल्किया हा पूर्व चेल्सी आणि लिसेस्टर सीटीसाठी फुटबॉल खेळतो. जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळाडू म्हणून त्याच्या नावापुढे नोंद आहे.

ब्रुनेईचे सुल्तान हसनल बोल्किया यांचा फ्रॅक बोल्किया हा भाचा आहे. त्याच्याकडे तब्बल 1300 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. ‘डेली स्टार’ने याबाबत वृत्त दिले आहे.

फ्रॅक बोल्किया याचे लहानपणापासून व्यवसायिक फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न होते. 9 मे 1998 ला अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेल्या फ्रॅक बोल्किया याने इंग्लंडच्या बर्गशायरच्या ब्रॅडफिल्ड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि येथेच त्याला फुटबॉलचे वेड लागले.

2009 मध्ये तो साउथहॅम्प्टनच्या यूथ अकादमीमध्ये सहभागी झाला. 2013 मध्ये प्रीमिअर लीगमध्ये आर्सेनेल संघाने त्याला करारबद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याने अखेर चेल्सीकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

चेल्सीनंतर 2016 मध्ये तो लिसेस्टरमध्ये सहभागी झाला. चार वर्ष तो या क्लबकडून खेळला. यानंतर त्याने पोर्तुगालचा मॅरिटिमो हा क्लब जॉईन केला.