
सामना प्रतिनिधी । जालना
राजकीय द्वेशातून महिलेला बलात्काराची खोटी फिर्याद देण्यास भाग पाडणार्या सात जणांविरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच आरोपींना अटकही करण्यात आली आहे. जालना तालुक्यातील अंहकार मानदेऊळगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी मुलाला खोलीत डांबून जालींदर बापुराव डोईफोडे, पंडीत आसाराम शिंदे, सुभाष नारायण सोमधाने, साईनाथ शिवाजी गंडाळ यांनी बलात्कार केल्याची तक्रार तालुका जालना पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन १८ नोव्हेंबर रोजी बलात्काराचा गुन्हा तालुका जालना पोलीस ठाण्यात करण्यात आला होता. या प्रकरणात पोलीसांनी आरोपीची चौकशी केली, आरोपीचे या काळातील वास्तव्य याचीही माहिती घेतली. त्याचप्रमाणे तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता पिडीत महिलेला बाळासाहेब सोमधाने, देविदास सोमधाने, कृष्णा सोमधाने, महिेंद्र कबले, परमेश्वर गंडाळ, अर्जुन सोमधाने, मनोहर सोमधाने यांनी खोटी तक्रार करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे तालुका जालना पोलीस ठाण्यात बाबासाहेब सोमधाने, देविदास सोमधाने, कृष्णा सोमधाने, महिंद्र कबले, परमेश्वर गंडाळ, अर्जुन सोमधाने, मनोहर सोमधाने यांच्या विरोधात खोटी तक्रार करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पाच आरोपींना २१ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.



























































