
दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या सोनोशी येथील संभाजी आसाराम काकडे (41 ) या शेतक-याने रविवारी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुष्काळामुळे दोन वर्षापासुन शेतातुन काहीच उत्पन्न मिळाले नाही. यामुळे संभाजी निराश झाले होते. शेतात खर्च केले तेवढेही उत्पन्न न मिळाल्याने घराचा वाढता खर्च व कमी उत्पन्न यामुळे ते अनेक दिवसांपासून नाराज होते. मुलांचे शिक्षण व विवाह हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. कोणतेही उत्पन्न नसल्याने कंटाळुन त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्युंची नोंद केली आहे. पोलिसांना काकडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली आहे.

































































