शेतातून घरी येताना बोट पलटी झाली, आईसह दोन मुलं बुडाली

माजलगाव मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटरचे पाणी वाढल्याने ग्रामस्थांना रहदारी साठी बोटीचा वापर करावा लागत आहे. शेतातून घरी येत असताना जोराच्या वाऱ्यामुळे बोटीने हेलकावे खाल्ले यात पाच जण पाण्यात पडले त्यातील दोघे जण पाण्या बाहेर आले मात्र आई सह दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव मध्ये घडली

वडवणी तालुक्यातील खळवट लिबगाव येथे माजलगाव प्रकल्पाच्या बॅक वॉटरने विळखा घातला आहे. धरण 100 टक्के भरल्याने धरणातील पाणी दूरवर पोहोचले आहे, या गावातील नागरिकांना शेतात जाण्यासाठी बोटचा आधार घ्यावा लागतो. आज सायंकाळी पाच जण आपल्या शेतातून गावाकडे बोट मधून येत असताना जोरदार वाऱ्यामुळे बोटीने हेलकावे खाल्ले यात बोटी तील पाच जण पाण्यात पडले त्यातील दोघे जण पाण्याबाहेर येण्यात यशस्वी झाले मात्र आई अन दोन मुले मात्र पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती कळताच वडवणी चे तहसीलदार श्रीकिसन सांगळे , मंडळ अधिकारी , तलाठी , पोलीस प्रशासनाने खळवट लिबगाव कडे धाव घेतली, सोबत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख विनायक मूळे अन युवा सेनेचे पदाधिकारी वाचीस्ट शेडगे यांनी ही मदतीसाठी धाव घेतली आहे. सुषमा भारत फरताडे वय 30, आर्यन भारत फरताडे 5 अन त्यांची भाची वय 7 या तिघा जणांचा शोध सुरू आहे. या घटनेने खळवट लिबगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या