fa शन Pa शन…मी सौंदर्यवती

195

पद्मजा फेणाणी

आवडती फॅशन...वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्क व नेटच्या मोठे जरी काठ असलेल्या साडय़ा, तसेच हिरे, मोत्यांचे दागिने आणि ब्रोचेस.

फॅशन म्हणजे...तनामनाला खुलवणारी, आनंद देणारी.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…फ्रॉक्स, टॉप्स, ट्राऊजर्स आणि मिडीज.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?... संपूर्ण व्यक्तिमत्व. सालस, सुंदर आणि उठावदार करते ती फॅशन.

आवडती हेअरस्टाईल?...गेली पंचवीस वर्षे एकाच हेअर ड्रेसरकडून केस कापत असल्याने हीच माझी स्वतंत्र ओळख झालीय.

फॅशन जुनी की नवी?... दोन्ही. कपडय़ांची किंवा दागिन्यांची रंगसंगती केल्याने मन, चेहरा प्रसन्न होतो, ती नवी अथवा जुनी फॅशन आवडते.

आवडता रंग?...ऑफ व्हाईट, पेस्टल कलर्स, केशरी, लाल.

तुमच्या जवळच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते?…आईला मी साडीत आवडते, बहिणीला मी वेस्टर्न आऊटफिटमध्ये आणि नवरा सुनील याला मी जीन्स आणि कुडत्यामध्ये जास्त आवडते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?...आवडते. पूर्वी गंमत म्हणून स्ट्रीट शॉपिंग व्हायची. पण अलिकडे संगीत, लेखन, वाचन, अभ्यास, कार्यक्रम यापुढे फारसा वेळ मिळत नाही.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?… कपाटे खच्च कपडय़ांनी भरलेली असल्याने माझ्यासाठी खरेदी न करता इतरांना भेटवस्तू देण्यासाठी खरेदी करते.

आवडता ब्रॅण्ड...मनभावन कुठलीही वस्तू ब्रॅण्डेडचे पाहिजे असा हट्ट नाही.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?… माझी आई शैलजा व चित्रकार बहीण उषाताईंची निवड, प्रत्येक बाबतीत उंची असल्याने माझ्या साडय़ा, कपडे, दागिने, ब्रोचेस त्याच आणतात. कुठे, काय व कसे परिधान करावे याचे मला कायम मार्गदर्शन करतात, जे जगभरच्या माझ्या चाहत्यांना खूप भावते.

फॅशन फॉलो कशी करता...कॉमन गोष्टी करणं टाळते. माझी स्वतंत्र शैलीच आवडते.

ब्युटी सिक्रेट...संगीतात बुडून स्वतः आणि दुसऱयांना आनंदी ठेवणे.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी...मोबाईल, लिपस्टिक, कुशल कंठिल.

फिटनेससाठी… संगीत हेच माझे अध्यात्म असल्याने रियाझ हाच माझा व्यायाम असतो. चवीचे, पैष्टिक, योग्य गोष्टी खाण्यावर माझा भर असतो.

आपली प्रतिक्रिया द्या