समलैंगिकता नैसर्गिक! समलैंगिक तरुणाच्या वडिलांनी व्यक्त केल्या भावना

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन समलिंगी विवाह सोहळा करणाऱ्या तरुणाच्या वडिलांनी समलैंगिकता नैसर्गिक असं म्हटलं आहे. जानेवारी महिन्यात यवतमाळ येथे अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने आपल्या समलैंगिक मित्रासोबत लग्न केलं होतं. या विवाहाला वराच्या आईने मात्र प्रचंड विरोध केला होता. तरीही हा लग्नसोहळा पार पडला होता.

हृषिकेश साठवणे असं या तरुणाचं नाव असून तो अमेरिकेत राहतो. त्याने जानेवारीत आपल्या समलैंगिक मित्राशी वैदिक पद्धतीने विवाह केला. घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी विवाह केला होता. आता समलैंगिकता हा गुन्ह्यांच्या श्रेणीतून वगळल्याने साठवणे यांच्या वडिलांनी समलैंगिकता हे नैसर्गिक असल्याचं मान्य केलं आहे. या निर्णयावर हृषिकेश यांनीही आपला आनंद व्यक्त केला आहे.

summary- father of gay man accepted his marriage