
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकप्रिय सोशल नेटवर्क वेबसाईट फेसबुक आणि व्हॉट्सऍप डाऊन झाले होते. त्यामुळे नेटकरी चांगलेच त्रस्त झाले होते. हिंदुस्थानमध्ये डेस्कटॉपवरी फेसबुक डाऊन झाले होते. मोबाईलवरी फेसबुक ऍपला व्यवस्थित चालताना दिसत होते.
हिंदुस्थानमध्ये सांयकाळी चार वाजता फेसबुक डाऊन झाले होते. फेसबुक डाऊनचा सर्वाधिक फटका अमेरिका, मलेशिया आणि तुर्कीवर पडला आहे. फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपही काही काळासाठी बंद पडले होते.
यापूर्वीही वेबसाईटच्या देखभाल आणि अद्ययावत करण्यासाठी फेसबुक बंद पडले होते. त्यावर ट्विटरवर एकच हलकल्लोळ माजला होता.





























































