पिकनीकसाठी लोणावळ्याला जाताय? मग ही बातमी आवर्जून वाचा

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । पुणे

पावसाचा खरा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची पावले लोणावळ्याकडे आपोआप वळतात. पावसाळ्यात लोणावळ्यातील पर्यटनस्थळे, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स पर्यटकांनी फ़ुलून जातात. परंतु ज्या पदार्थांपासून लोणावळ्यात अन्न पदार्थ निष्कृष्ठ पदार्थांपासून बनवले जातात. अन्न व औषध प्रशासनाने मारलेल्या धाडीत अनेक हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

हॉटेल्समध्ये निष्कृष्ठ दर्जाचे बर्फ वापरले जाते अशी खबर अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने काही हॉटेल्सवर धाडी घातल्या. एकूण 10 हॉटेल्समध्ये निष्कृष्ठ पदार्थांपासून अन्न शिजवले जात होते. त्यात खराब झालेले कोंबड्यांचे मांस, ब्रेड, दूध असे पदार्थ जप्त केले आहे. प्रशासनाने तब्बल 10 हॉटेल्सवर कारवाई केली आहे. तसेच लोणावळ्यातील सुप्रसिद्ध कुमार रीसॉर्ट मधून निष्कृष्ठ दर्जाचे 30 किलो कोंबडीचे मांस जप्त केले आहे. रिदम हॉटेलमध्ये चिकन, पनीर, ज्युस, वेफर या खाद्यपदार्थांची एक्सापायरी डेट ऊलटूनही ते ग्राहकांना विकण्यात आले आहे. सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर अन्न व सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.