दिवाळखोरीतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तान चीनला भाड्यावर देऊ शकते गिलगीट बाल्टिस्तान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान हा देश अक्षरश: आर्थिक दिवाळखोरीला आला आहे. देशात महागाई गगनाला भिडली असून त्यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाज्यांच्या दरांनी शंभर व दोनशेचे दर पार केले असून पेट्रोल डिझेल दोनशे रुपयांवर गेले आहे. त्यामुळे देशात हाहाकार माजलेला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता गिलगीट बाल्टिस्तान हा वादग्रस्त प्रांत चीनला भाड्याने देण्याचा विचार करत आहे.

काराकोरम नॅशनल मुव्हमेंटचे अध्यक्ष मुमताज नगरी यांनी याबाबत सांगितले असून गिलगीट बाल्टिस्तानमधील स्थानिक नागरिकांमध्ये ही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ”गिलगीट बाल्टिस्तानमधील जनता सध्या भयभीत आहे. पाकिस्तान या प्रांताला भाडेतत्वावर चीनला देऊन त्याचा भविष्यात युद्धभूमीसाठी वापर करायला देऊ शकते. अशी चर्चा तेथे सुरू आहे’, असे नगरी यांनी सांगितले.

चीन पाकिस्तान इकॉनॉमी कॉरिडॉर (CPEC) च्या अंतर्गत हा करार होऊ शकतो व चीन नैऋत्य दिशेने स्वत:च्या वाढीसाठी या प्रांताचा वापर करू शकते. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे देशाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो तसेच त्यामुळे पाकिस्तानवरचे आर्थिक संकट काही अंशी कमी होऊ शकते.