जालन्यातील महिला तहसीलदाराला लाच घेताना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील बदनापूरमधील तहसिलदार सुमन मोरे व महसुल सहायक निलेश गायकवाड यांना वारसा हक्कानुसार भोगवटादाराची नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल 30 हजारांची लाच घेताना जालना एसीबीच्या पथकाने 3 जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले. त्यामुळे जालन्यातील महसुल विभागामधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील रामखेडा शिवारातील गट क्रं. 85, 86 व मौजे रामखेडा शिवारातील गट क्रं. 9 मधील शेत जमीन आजोबांच्या नावावरील जमीन वारसाने एकत्रित कुटुंब कर्ता म्हणून चुलत्याच्या नावे सातबाऱ्यावर भोगवटदार म्हणून नोंद करण्यात आली होती. कुटुंब कर्ता म्हणून घेतलेली नोंद कमी करून इतर वारसांची नावे सातबाराच्या उताऱ्यावर नोंद कमी करून इतर वारसांची नावे सातबाऱ्यावर लावून घेऊन फेर नक्कल देण्याकरीता तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे आणि महसुल सहाय्यक निलेश धर्मराज गायकवाड यांनी संबंधित व्यक्तीकडून तीस हजार रूपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून बदनापूर तहसील कार्यालयात या दोघांनाही रंगेहाथ पकडले.

एसीबीच्या पथकाने लाचेची रक्कम जप्त केली असून, या दोघांविरूद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.