मुंबई- मंगळुरु जंक्शन/मडगाव जंक्शन आणि पुणे- अजनीदरम्यान फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी दिवाळी आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे विश्ष ट्रेन चालवणार आहे. या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनमध्ये मुंबई- मंगळुरु जंक्शन/मडगाव जंक्शन आणि पुणे- अजनी यांचा समावेश आहे.

मुंबई- मंगळुरु जंक्शन साप्ताहिक विशेष – 01185 स्पेशल 21.10.2022 ते 11.11.2022 (4 फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 17.05 वाजता पोहोचेल. 01186 स्पेशल 22.10.2022 ते 12.11.2022 (4 फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी मंगळुरु जंक्शन येथून 18.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल हे थांबे असतील. एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामधे दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना असेल.

मुंबई – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष – 01187 स्पेशल 16.10.2022 ते 13.11.2022 (5 फेऱ्या) पर्यंत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 22.15 वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 12.30 वाजता पोहोचेल. 01188 स्पेशल 17.10.2022 ते 14.11.2022 (5 फेऱ्या) पर्यंत दर सोमवारी मडगाव जंक्शन येथून 13.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी 23.45 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे असतील. एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामधे दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना असेल.

पुणे जंक्शन – अजनी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष – 01189 स्पेशल 18.10.2022 ते 29.11.2022 (7 फेऱ्या) पर्यंत दर मंगळवारी पुणे जंक्शन येथून 15.15 वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी 04.50 वाजता पोहोचेल. 01190 स्पेशल 19.10.2022 ते 30.11.2022 (7 फेऱ्या) दर बुधवारी अजनी येथून 19.50 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 11.35 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील. 13 तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन अशी गाडीची संरचना असेल.

01185/01186 आणि 01187/01188 स्पेशल 30.10.2022 पर्यंत मान्सूनच्या कालावधीतील वेळापत्रकानुसार आणि दि. 6.11.2022 पासून रोहा आणि मंगळुरू जं./मडगाव दरम्यान गैर-मान्सून नसलेल्या वेळापत्रकानुसार चालतील. विशेष गाड्या क्र.01185, 01187/01188 आणि 01189/01190 विशेष शुल्कासह बुकिंग 16.10.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.