FIFA 2018 : वीस वर्षानंतर फ्रान्स पुन्हा जगजेत्ता

43
15 जुलै फुटबॉल विश्वचषक फ्रान्सने पटकावला

सामना ऑनलाईन | मॉस्को

रशियात माॅस्को इथे झालेल्या २१व्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने अजिंक्यपद पटकावले आहे. रविवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक अंतिम सामन्यात फ्रान्सनर क्रोएशियाला ४-१ अशा गोल फरकाने नमवलं आणि दुसऱ्यांदा आपलं नाव विश्वचषकावर कोरलं. १९९८ नंतर तब्बल वीस वर्षांनंतर फ्रान्सने विश्वचषक जिंकला आहे.

विशेष म्हणजे १९३० साली पहिल्या विश्वचषकाचा पहिला सामना मेक्सिकोला नमवून फ्रान्सने जिंकला होता. आज २१ व्या विश्वचषकात, एकूण विश्वचषक स्पर्धांमधला हा ९०० वा सामनाही फ्रान्सनर जिंकला आणि जगज्जेतेपदही. गेल्या तीन विश्वचषकात अंतिम सामने अतिरिक्त वेळेत गेले होते. या वेळी मात्र ही परंपरा मोडीत निघून सामना निर्धारीत वेळेत संपला. गुणफलक ४-२ असा एकतर्फी दिसत असला तरी रंगतदार सामन्यात क्रोएशियानं शेवटपर्यंत कडवी लढत दिली.

मध्यंतरापर्यंत फ्रान्सनं २-२ अशी आघाडी घेतली. सामन्यांच्या १८ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्रीकीकवर फ्रान्सच्या ग्रिझमनने तटवलेला चेंडू क्रोएशियाच्या मॅन्डझुकीकच्या डोक्याला लागून जाळ्यात गेला आणि क्रोएशियाच्या या स्वयंगोलमुळे, फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळाली. मात्र फ्रान्सचा आनंद थोडाच वेळ टिकला. २८ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्रीकीकवर क्रोएशियानं सुरेख चाल रचत उजव्या बगलेतनं आक्रमण केलं आणि पेरीसिकनं चेंडू अचूक जाळ्यात तडकवत क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अडतिसाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कीकचे गोलमध्ये रुपांतर करत ग्रिझमननं फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरपर्यंत फ्रान्स आघाडीवर होता.

मध्यांतरानंतर फ्रान्सने अधिक आक्रमक खेळ केला. ५९ व्या मिनिटाला गोल करत पोग्बाने तर ६५ व्या मिनिटाला गोल करत एमबापेने फ्रान्सची आघाडी ४-१ अशी मजबूत केली. पाठोपाठ ६९ व्या मिनिटाला गोल झळकवत क्रोएशियाच्या मॅन्डझुकीकने फ्रान्सची आघाडी ४-३ अशी कमी केली. क्रोएशियाच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत केलेले प्रयत्न अखेर कमी पडले आणि फ्रान्सचा विजय निश्चित झाला.

गोल्डन बूट पुरस्कार – हॅरी केन (६ गोल, इंग्लंड)
गोल्डन बाॅल पुरस्कार – ल्युका माॅड्रीच (क्रोएशिया) युवा खेळाडूचा पुरस्कार – एमबॅपे (फ्रान्स)
गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार – थिबा कोर्टीअस (बेल्जियम)

फुटबॉल वर्ल्डकप विजेते –

● ब्राझील ५ वेळा
● इटली आणि जर्मनी प्रत्येकी ४ वेळा
● उरुग्वे, अर्जेंटिना आणि फ्रान्स प्रत्येकी २ वेळा
● इंग्लंड आणि स्पेन प्रत्येकी १ वेळा

आपली प्रतिक्रिया द्या