वर्ल्ड कपमध्ये हीरो ठरलेले फुटबॉलपटू

44

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

रशियात गेल्या महिनाभर ३२ संघांमध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपच्या महासंग्रामात रविवारी फ्रान्सने क्रोएशियाला धूळ चारून दुसऱ्यादा जगज्जेतेपदाचा झळाळता करंडक उंचावला. विजेतेपदाबरोबर संपूर्ण स्पर्धेत विविध आघाड्यावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि संघांनाही ‘फिफा’कडून गौरकिण्यात आले. अंतिम सामना संपल्यानंतर ‘फिफा’कडून एका दिमाखदार पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सोहळ्यात या सर्क ‘हीरो’ फुटबॉलपटूंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

extras_noticia_foton-1

गोल्डन बॉल : हा पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिच याला प्रदान करण्यात आला. फिफाच्या टेक्निकल स्टडी ग्रुपमधील सदस्यांच्या मताधिक्याच्या आधाराकर सर्कोकृष्ट खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो.

eden-hazard

सिल्क्हर बॉल : हा पुरस्कार बेल्जियमच्या एडीन हॅजार्ड याला देण्यात आला. सर्कोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील दुसाऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.

antoine-griezmann-2

ब्राँझ बॉल : हा पुरस्कार अंतिम सामन्यात सामनाविर ठरलेल्या फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमनला मिळाला. सर्कोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.
harry-kane-golden-boot-main-1

गोल्डन बूट :हा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याला देण्यात आला. स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. हॅरी केन याने एकूण सहा सामन्यांत सर्वाधिक सहा गोल केले.

antoine-griezmann-2

सिल्क्हर बूट : हा पुरस्कार फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला देण्यात आला. स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. अँटोइन ग्रीझमनने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.

thibat-cotreis-1

गोल्डन ग्लोव्हज : हा पुरस्कार बेल्जियमचा गोलरक्षक थिबॉट कोटरेइस याला देण्यात आला. हा पुरस्कारही फिफाच्या टेक्निकल स्टडी ग्रुपमधील सदस्यांच्या मतांच्या आधाराकर सर्वोकृष्ट गोलरक्षकाला देण्यात येतो.

kaliyan-ambappe-1

सर्वोत्तम युवा खेळाडू : हा पुरस्कार फ्रान्सच्या कालियान एम्बाप्पे याला देण्यात आला. २०१८ च्या फिफा विश्कचषकात एम्बाप्पेने आपला ठसा उमटकला. फ्रान्सकडून महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने गोल केले. अंतिम सामन्यातील त्याचा गोल हा प्रसिद्ध खेळाडू पेले यांच्या विक्रमाची बरोबरी करणारा ठरला

spain-1

शिस्तबद्ध कामगिरी : स्पेनच्या फुटबॉल संघाला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील सर्व सामन्यांत सार्वधिक शिस्त आणि खिलाडूवृत्तीने खेळणाऱ्या संघाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या