
फिफा वर्ल्ड कपचे दिमाखदार आयोजन करणाऱ्या यजमान कतारची या स्पर्धेतील विजयाची पाटी अखेर कोरीच राहिली. ‘ए’ ग्रुपमधील अखेरच्या गट लढतीत नेदरलॅण्ड्सने कतारवर 2-0 गोलफरकाने पराभव करीत कारकीर्दीत 11 व्यांदा विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठली. कतारच्या पराभवाच्या हॅटट्रिकमुळे स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झाला.
सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या नेदरलॅण्ड्सने 26व्या मिनिटाला गोल केला. कोडी गॅक्पो याने सलग तिसऱ्या लढतीत गोल करत आपल्या संघाचे खाते उघडले. मध्यंतरानंतर 49 व्या मिनिटाला मिडफिल्डर फ्रँकी डी जोंगने सुरेख गोल करीत नेदरलॅण्ड्सची आघाडी 2-0 अशी वाढविली. ही आघाडी कायम राखत नेदरलॅण्ड्सने विजयाला गवसणी घातल ‘ए’ ग्रुपमधून सर्वाधिक 7 गुणांची कमाई करीत अव्वल स्थान मिळविले. सेनेगल 6 गुणांसह दुसऱ्या, इक्वाडोर 4 गुणांसह तिसऱ्या, तर एकही विजय न मिळविलेला कतार अखेरच्या चौथ्या स्थानावर राहिला. आता उप उपांत्य फेरीत नेदरलॅण्ड्ची गाठ ‘बी’ ग्रुपमधील दुसऱ्या स्थानावरील संघाशी पडेल.
कतारचा नकोसा विक्रम
फिफा वर्ल्ड कपमध्ये गट फेरीत एकही विजय मिळविता आला नाही किंवा लढत ड्रॉदेखील करता आली नाही. असा नकोसा विक्रम केलेला कतार हा पहिला यजमान संघ ठरला. याआधी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका हा गट फेरीत आव्हान संपुष्टात आलेला पहिला यजमान संघ ठरला होता, मात्र त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने एक विजय, एक ड्रॉ व एक पराभव अशी कामगिरी केली होती.
फिफा वर्ल्ड कप गुणतालिका
गट ए
संघ सा. वि. ड्रॉ प. गुण
नेदरलॅण्ड्स 3 1 2 0 5
सेनेगल 3 2 0 1 6
इक्वॉडोर 3 1 1 1 4
कतार 3 0 0 3 0
गट बी
इंग्लंड 2 1 1 0 4
इराण 2 1 0 1 3
अमेरिका 2 0 2 0 2
वेल्स 2 0 1 1 1
गट ई
स्पेन 2 1 1 0 4
जपान 2 1 0 1 3
कोस्टारिका 2 1 0 1 3
जर्मनी 2 0 1 1 1
गट एफ
क्रोएशिया 2 1 1 0 4
मोरोक्को 2 1 1 0 4
बेल्जियम 2 1 0 1 3
पॅनडा 2 0 0 2 0
गट जी
ब्राझील 2 2 0 0 6
स्वित्झर्लंड 2 1 0 1 3
पॅमेरून 2 0 1 1 1
सर्बिया 2 0 1 1 1
गट एच
पोर्तुगाल 2 2 0 0 6
घाना 2 1 0 1 3
द. कोरिया 2 0 1 1 1
उरुग्वे 2 0 1 1 1
(टीप ः सा – सामने, वि – विजय, प – पराभव)
ही गुणतालिका पोर्तुगाल-उरुग्वेपर्यंतची आहे.