
संपूर्ण देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा कोषागार प्रकरणात राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने 60 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाने या प्रकरणात गेल्या आडवड्यात लालूंसह एकूण 75 जणांना दोषी ठरवले होते. न्यायालयाने याआधी 35 दोषींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे.
Fifth fodder scam case | CBI court in Ranchi sentences RJD leader Lalu Prasad Yadav to 5 years’ imprisonment and imposes Rs 60 Lakh fine on him. pic.twitter.com/413701Rt5W
— ANI (@ANI) February 21, 2022
विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी सोमवारी शिक्षेचा निर्णय जाहीर केला. न्यायालयातील संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. लालूप्रसाद हे सध्या रिम्स रुग्णालयात असल्यामुळे त्यांच्यासाठी रिम्स रुग्णालयातील पेइंग वॉर्डमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली.
























































