पाबळच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
molestation-1

सामना प्रतिनिधी, कवठे येमाई

पाबळ ता. शिरूर येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी माजी महिला सरपंचांचा हात पकडून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्थानकात पाबळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कुंदन रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार पाबळ ता. शिरूर येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कुंदन रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला माजी सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर महिला माजी सरपंच काही कामानिमित्त ग्रामपंचायतमध्ये गेल्या असता त्यांनी ग्रामविकास अधिकारी व विद्यमान सरपंच व काही नागरिक त्या ठिकाणी होते. तेव्हा ग्रामविकास अधिकारी यांचेशी सदर महिलेने चर्चा केली. त्यांनतर ग्रामविकास अधिकारी रोकडे व सदर महिला सरपंचांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी विद्यमान सरपंच व उपस्थित नागरिक बाहेर गेल्यावर कुंदन रोकडे यांनी वाईट हेतूने सदर महिला सरपंचांचा हात पकडला आणि कार्यालयातून बाहेर काढले. “त्यावेळी तू महिला आहेस म्हणून सोडतो नाहीतर मुस्काडून बाहेर काढले असते” असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे सदर माजी महिला सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत महिलेने सरपंचांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पाबळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कुंदन रोकडे ३३ यांच्याविरुद्ध विनयभंग, दमदाटी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ग्रामविकास त्यंना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

एकाही ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक नाही
शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन महिन्यांपूर्वी कान्हूर मेसाई येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सदाशिव शेलार यांच्यावर बेकायदा सावकारी व दमदाटी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून अद्याप पर्यंत सदर ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आलेले नाही. पाबळ येथील ग्रामविकास अधिकारी कुंदन रोकडे यांच्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली नाही.