
सामना ऑनलाईन । अकोला
अकोला येथील मोहम्मद अली मार्गावरील इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे दोन सिलिंडरचा स्फोट झाला आहे. ही इमारत रहिवासी इमारत असली तरी त्यातील नागरिकांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे सुदैवाने यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दल ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे.
























































