बोरिवलीत भंगार गोदामाला आग, शिवसैनिकांची मदतीसाठी धाव

बोरिवली पश्चिममधील गणपत पाटील नगर येथे आज सायंकाळी भंगार गोदामाला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी शिवसैनिकांसह घटनास्थळी धाव घेत स्थानिकांना मदत केली.

गणपत पाटील नगर येथे गल्ली क्रमांक 7 आणि 8 येथे प्लॅस्टिक साठवणाऱया भंगाराच्या गोदामाला आग लागली. प्लॅस्टिकमुळे आग वेगाने पसरत गेली. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करीत आहेत.