
लालबागमधील साईबाबा मार्गावर असलेल्या बेस्ट कर्मचारी वसाहतीतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीत संपूर्ण घरातील साहित्य जळून भस्मसात झाले. मात्र अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. गॅस सिलिंडर गळतीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लालबागमधील बेस्ट कर्मचारी वसाहतीतील ‘एन’ इमारतीत रात्रीच्या सुमाराला आग लागली. आगीची माहिती मिळताच काही मिनिटांतच अग्निशमन दलाची जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांनी तातडीने गॅस सिलिंडर जवळच्या मैदानात नेल्याने पुढील अनर्थ टळला. घरगुती सिलिंडरला गळती झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच माजी नगरसेवक अनिक कोकीळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी आढावा घेतला.