आरे कॉलनीच्या जंगलात भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील आरे कॉलनीच्या जंगलामध्ये भीषण आग लागली आहे. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आगीचे आणि धुराचे लोट गगनाला भिडल्याचे दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

दरम्यान, ही आग लागली की लावण्यात आली यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही. हा वनवा असल्याची प्राथमिक माहिती अग्नशमन दलाकडून देण्यात आली आहे.