बोरिवलीत इमारतीला लागलेल्या आगीत पाच जण गुदमरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बोरिवली पश्चिम शिवतपस्या हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीत लागलेल्या आगीत पाच जण गुदमरल्याची घटना घडली. जखमींना जवळच्याच करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली. एक्सर रोड येथील या इमारतीत सकाळी 7.30 वाजता वीज मीटरच्या बॉक्सला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट निर्माण झाले आणि यात 6 जण गुदमरले. अशोक काशीनाथ सुर्वे (71), वैशाली काशीनाथ सुर्वे (67), ऐश्वर्या (21), प्रियंका (23), रूपाली पवार (22) अशी या पाचजणांची नांवे असून त्यांना तातडीने जवळच्या करुणा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.