व्हिडीओ : पुणे हादरले, एकाच दिवशी गोळीबाराच्या 2 घटना; एक ठार, एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिजमोहन पाटील । पुणे

एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने पुणे शहर हादरले आहे. भरदिवसा झालेल्या दोन्ही घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येवलेवाडी येथे ‘गणेश ज्वेलर्स’वर दरोड्याचा प्रयत्न झाला. चार दरोडेखोरांनी ज्वेलर्समध्ये लुटमार करण्याचा प्रयत्न केला आणि एका कामगारावर गोळी झाडली. हल्लेखोराने झाडलेली गोळी कामगाराच्या काखेच्या खाली लागल्याने तो गंभीर जखमी झाला. अमृत परमार (30) असे या जखमी कामगाराचे नाव असून त्याच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्वेलर्स दुकानातील हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

त्यापूर्वी बुधवारी सकाळी मेस (खानावळ) चालवणाऱ्या एका महिलेवर घरात घुसून गोळी झाडण्यात आली. चंदननगर येथे ही घटना घडली. यात या महिलेचा मृत्यू झाला. एकता ब्रिजेश भाटी असे मृत महिलेचे नाव आहे.