मुंबईकर… मी येतोय! जगातील पहिला अभिनेता रोबो येणार पवईच्या आयआयटीत

278

मुंबईकर…मी येतोय. अभिनय करण्याचेही कसब असलेला जगातील पहिला रोबो ‘थेस्पियन’ याने आपण मुंबईत येणार असल्याचे जाहीर केले आहे. थेस्पियन काही साधासुधा रोबो नाही. 30 पेक्षा जास्त भाषा त्याला बोलता येतात. 70 पेक्षा जास्त प्रकारच्या आवाजामध्ये तो साभिनय संवाद साधू शकतो. तंत्रज्ञानाचा हा अनोखा आविष्कार पाहण्याची संधी पवई येथील आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’ महोत्सवात मुंबईकरांना मिळणार आहे.

आयआयटी मुंबईचा टेकफेस्ट म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाच देशातील सर्वात मोठा उत्सव असतो. येत्या 4-5 जानेवारी रोजी तो होणार आहे. ‘दाव्हिन्सियन स्पेक्टॅकल – अ फ्यूजन ऑफ आर्ट ऍन्ड सायन्स’ अशी या महोत्सवाची यंदाची संकल्पना आहे. त्यात 5 फूट 9 इंच उंचीचा आणि 33 किलो वजनाचा ‘थेस्पियन’ रोबो हे विशेष आकर्षण ठरणार आहे.

गाणे गातो, नृत्यही करतो
थेस्पियन हा व्यासपीठावर हजारो प्रेक्षकांसमोर गाणे गाऊ शकतो. नाचू शकतो. अभिनय करू शकतो. यापूर्वी जगभरात त्याच्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मोहिनी घातली होती. थेस्पियन व्यासपीठावर असला तरी उपस्थितांमधील प्रत्येकावर बारीक नजर ठेवण्याची क्षमता त्याच्यात आहे. प्रेक्षकांमध्ये कुणीही काही हालचाल केली तर त्यावरही तो कमेंट करतो अशी त्याची ख्याती आहे. या थेस्पियनशी संवाद साधण्यासाठी मुंबईकरांनी टेकफेस्टला यावे असे आवाहन टेकफेस्टच्या टीमने केले आहे.

अप्रतिम संवादकौशल्य
थेस्पियन हा कोणत्याही माणसाबरोबर सहजगत्या संवाद साधू शकतो. त्याच्या हालचाली हुबेहुब माणसासारख्या आहेत. त्याचे संवादकौशल्य, बोलण्याची स्टाईल आणि चेहऱयावरचे हावभाव अप्रतिम असतात. या रोबोचे डोळे एलसीडीचे आहेत. हसणे, रडणे, रागावणे, विनोद करणे, गंभीर होणे असे हावभाव त्याच्या डोळ्यांमधून उपस्थितांना दिसू शकतात. आपल्याशी संवाद साधणारी व्यक्ती पुरूष आहे की स्त्राr, तिचे वय किती आहे हेसुध्दा अचूक सांगू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या