मुंबईत अजगरांचा प्रचंड सुळसुळाट, फ्रीजखाली, बाथरूममध्ये आश्रय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उपनगरांमध्ये मानवी वस्त्यांमध्ये अजगर घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. पशूप्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन दिवसांत विक्रोळी, बोरिवली आणि दहिसरमधून पाच अजगरांची सुटका केली. हे अजगर इमारतींच्या लॉबीत, फ्रीजखाली आणि बाथरूममध्ये वेटोळे घालून बसले होते.

विक्रोळी पूर्व येथील गोदरेज वसाहतीमधील एका इमारतीच्या बाथरूममध्ये सहा फुटांचा अजगर घुसल्याची माहिती प्लँट अँड ऑनिमल्स वेल्फेअर असोसिएशनच्या (पॉझ) कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराला पकडले. अशाच प्रकारे दहिसर पूर्व येथील कोकणीपाडा परिसरातील दोन घरांमधून अनुक्रमे 7 फूट आणि 6 फूट लांबीचे दोन अजगर, शेठ मिडोरी येथील इमारतीच्या लॉबीमध्ये 6 फुटांचा अजगर आणि बोरिवली पश्चिम येथील साईनाथ नगरमधील एका घरातील फ्रीजखाली आश्रय घेतलेला अडीच फुटांचा अजगर पकडला गेला. या पाचही अजगरांची पशूवैद्यांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना निसर्गात सोडून देण्यात आले अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनीष सुब्रमण्यम यांनी दिली.