Skin Care Tips – चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी उटणे करा घरच्या घरी, वाचा

उटणे हा एक पारंपारिक सौंदर्य उपचार आहे. चेहऱ्याला उटणे लावल्यामुळे, त्वचेला अनोखा ग्लो येतो. उटण्याचा वापर हा फार पूर्वीपासून सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जात आहे. आर्युवेदिक उटणे चेहऱ्याला लावण्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच बाहेरून उटणे आणण्यापेक्षा घरच्या घरी उटणे करणे केव्हाही बेस्ट..

Beauty Tips – चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हा फेसपॅक आहे सर्वात उत्तम आणि स्वस्त, वाचा

आयुर्वेदिक उटणे कसे बनवायचे?

बार्ली पीठ

मसूर डाळ पावडर

तीळ पावडर

मुलतानी माती पावडर

पलाश फुल पावडर

बेसन

Skin Care – चेहऱ्यावर आठवडाभर ‘ही’ वस्तू लावाल तर तुमचाही चेहरा होईल सुंदर

आयुर्वेदिक उटणे बनवण्यासाठी, सर्व गोष्टी बारीक करून पावडर बनवा. नंतर ते सर्व 100 ग्रॅमच्या प्रमाणात घ्या आणि चांगले मिसळा. मिसळलेली पावडर एका काचेच्या डब्यात साठवा. नंतर आंघोळ करायची असेल तेव्हा गरजेनुसार एका भांड्यात एक किंवा दोन चमचे काढा आणि नंतर त्यात गुलाबजल, थोडे दूध आणि मध घाला. या मिश्रणाची गुळगुळीत पेस्ट तयार करा.

उटणे लावण्याची योग्य पद्धत

उटणे लावण्यापूर्वी त्वचा ओली करा आणि नंतर उटणे चेहरा, मान आणि शरीरावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने शरीरावल साबणासारखे चोळा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते काही काळ शरीरावर ठेवू शकता किंवा लावल्यानंतर थंड पाण्याने धुवा.