
सांगोला तालुक्यातील डिकसळ गावातील हॉटेल शिवनेरीवर छापा टाकून बनावट विदेशी दारूसह 15 लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला असून, तीनजणांना अटक करण्यात आली आहे.
महेश दगडू शिंदे (रा. डिकसळ, ता. सांगोला), रोहित राजाराम शिंदे (रा. येळवी, ता. जत, जि. सांगली), किरण बाळासाहेब साबळे (रा. पाटे, ता. सांगोला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगोल्याजवळील डिकसळ गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल शिवनेरीमध्ये बनावट विदेशी दारूविक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. हॉटेलवर छापा घातला असता, बनावट विदेशी दारूचे 52 बॉक्स व अन्य साहित्य आढळले. पोलिसांनी विदेशी दारूसह बोलेरो, मारुती अल्टो, दुचाकी असा 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.
जिह्यात अवैध दारूविक्री सर्रासपणे हॉटेल व धाब्यावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काने विशेष पथकाद्वारे कारवाईची मोहीम सुरू केली आहे. निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक, कैलास छत्रे, सहायक दुय्यम निरीक्षक रवि पवार व त्यांच्या पथकाने केली आहे.


























































