पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा इशारा

दहशतवाद पोसणाऱया पाकिस्तानला हिंदुस्थानने पुन्हा ठणकावले आहे. सध्या हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र यापुढे पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या तर हिंदुस्थान थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी दिला. दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी हिंदुस्थान त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देईल, असा दावा जयशंकर यांनी केला. ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना त्यांनी थेट इशारा दिला.