
कारगील युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तानवर विजय मिळवला पण हिंदुस्थानच्या त्यावेळच्या परिस्थितीचा इतर देशांनी फायदा घेतला असा आरोप माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी केला. एका देशाने जुन्या वापरलेल्या बंदुका आपल्याला जास्त किमतीत विकल्या, दुसऱया एका देशाने 1970मध्ये तयार केलेला दारूगोळा दिला तर उपग्रहामार्फत घेतलेल्या प्रत्येक फोटोसाठी देशाला 36 हजार रुपये मोजावे लागले असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला.
चंदिगड येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनी हा गौप्यस्फोट केला. कारगील युद्धाच्या वेळी हिंदुस्थानला शस्त्र्ाास्त्र्ाs, दारूगोळय़ाची नितांत गरज होती. ऐनवेळी खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. या परिस्थितीचा विक्रेत्या देशांनी फायदा घेतला. एका देशाकडे आम्ही बंदुका मागितल्या. जुन्याच बंदुका दुरुस्त करून आम्हाला जास्त किमतीत विकण्यात आल्या. दारूगोळय़ासाठी आम्ही एका देशाशी संपर्क साधला. त्यांनी दारूगोळा देण्याचे मान्य केले. पण तो 1970 मध्ये तयार केलेला.
























































