नगरमध्ये माजी नगरसेवकाला जमावाची भररस्त्यात मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेचे माजी नगरसेवक संजय झिंजे यांना मंगळवारी दुपारी टिळक रस्त्यावर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. संजय झिंजे मंगळवारी टिळक रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे त्यांना सूरज जाधव याने धक्का दिला. त्यांनी त्याला विचारणा केली.

मात्र, तेथे असलेल्या आमदार जगताप यांनी जाधवला शांत बसण्यास सांगितले. मात्र, जाधव याने तेथेच आपल्याला शिवीगाळ करत ‘बाहेर ये, मग दाखवतो’ अशी धमकी दिली. बाहेर आल्यानंतर दहा ते बाराजणांनी आपल्याला मारहाण सुरू केली. यावेळी आमदार जगताप तेथे उपस्थित होते. त्यांनी ‘सोडा सोडा’ असे मारहाण करणाऱयांना सांगितल्याचे झिंजे म्हणाले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत दोन्ही गटांकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.