
नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. अटकेच्या काही तासांनंतरच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 77 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने ओली यांच्यासह लेखक व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला होता. हा अहवाल स्वीकारून नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी पुढील कारवाईला मंजुरी दिली. त्यानंतर ओली यांना भक्तपूर जिह्यातील त्यांच्या निवासस्थानावरून, तर रमेश लेखक यांना सूर्यविनायक भागातील निवासस्थानावरून अटक करण्यात आली होती.
























































