
सामना ऑनलाईन । मुंबई
न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाचा सेमी फायनलच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर आता फलंदाजीतील चौथ्या क्रमांकाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विश्वचषकासाठी निवड झालेल्या संघात संधी न मिळालेला फलंदाज अजिंक्य रहाणे हाच चौथ्या क्रमांकासाठी योग्य असल्याचे मत निवड समितीचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी व्यक्त केलं आहे.
Former BCCI Secy Sanjay Jagdale: I think team needs batsman like Ajinkya Rahane at 4, We kept experimenting for 3 months&with players who didn’t have a proven track record outside sub-continent.Rahane has always scored in England, Rishabh Pant made test 100s in England&Australia pic.twitter.com/L7EaXk4HmZ
— ANI (@ANI) July 13, 2019
चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, विजय शंकर, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत यांच्यामध्ये चुरस होती. मात्र यातील विजय शंकर व रिषभ पंत यांना संधी मिळाली तर त्यांच्याहून जास्त किंबहुना खूप जास्त अनुभव असलेल्या विजय शंकर, दिनेश कार्तिक व अजिंक्य रहाणे यांना संधी दिली गेली नाही. यावरून टीम इंडियाच्या निवड समितीवर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
Sanjay Jagdale: We kept playing Shankar,Rayudu&Karthik. Both Rayudu& Kartik have been playing since ’03 but couldn’t establish.Shankar didn’t have experience of playing in England.I had been speaking of Rahane since middle order looked weak.Selectors should have had better vision https://t.co/bvmI2QuvwF
— ANI (@ANI) July 13, 2019
‘टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे सारखा फलंदाज हवा आहे. ज्यांना देशाबाहेर खेळायचा फार अनुभव नाही त्यांच्या आपण गेले तीन महिने चौथ्या स्थानावरील फलंदाजासाठी प्रयोग करत आहोत. रहाणेने इंग्लंडमध्ये चांगली फंलदाजी केली होती. विजय शंकरला इंग्लंडमध्ये खेळायचा अनुभव नाही तरी त्याला संधी दिली गेली. जेव्हापासून हा चौथ्या क्रमांकाचा मुद्दा जोर धरू लागला होता तेव्हापासून मी रहाणेचे नाव घेतोय. निवड समितीने दूरदृष्टी ठेवायला हवी होती’, असे जगदाळे यांनी सांगितले.

























































