सेबेस्टियन लेकोर्नू पुन्हा फ्रान्सच्या पंतप्रदानपदी, 4 दिवसांपूर्वी दिला होता राजीनामा

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेबेस्टियन लेकोर्नू यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. मात्र याआधी म्हणजेच चार दिवसांपूर्वीच लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी पुन्हा त्यांची पंतप्रदानपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केल्यानंतर लेकोर्नू यांनी सोशल मीडिया एक पोस्ट करत म्हटले आहे की, त्यांनी पंतप्रधानपदाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

सेबेस्टियन लेकोर्नू म्हणाले आहेत की, “त्यांना वर्षाच्या अखेरीस फ्रान्सचा अर्थसंकल्प सादर करण्याचे आणि देशवासीयांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याचे काम देण्यात आले आहे.” दरम्यान, लेकोर्नू हे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे जवळचे सहकारी मानले जातात. सहकारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर लेकोर्नू यांनीआपल्या पदाचा राजीनामा दिला होता, असं बोललं जातं. मात्र आता पुन्हा त्यांना संधी देण्यात आली आहे.