मुंबई-अहमदाबाद मार्गावर पालघरजवळ भीषण अपघात, 4 ठार; 8 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) रविवारी भीषण अपघात झाला. प्रवासी व्हॅन आणि कंटेनर ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघरजवळील मनोर (Manor) भागात हा अपघात झाला आहे, अशी माहिती पालघर पोलिसांनी (Palghar Police) दिली आहे.