आडवाटेला लघुशंका नडली, चोरांनी गाडीही पळवली अन् रोख रक्कमही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

लघुशंकेसाठी थांबले असताना चोरांनी चारचाकीसह रोख रक्कम पळवल्याची घटना काष्टी येथील मातोश्री हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौड येथील दत्तात्रय ननवरे हे पत्नीसह चारचाकी गाडीने श्रीगोंदा येथील नातेवाईकांना भेटून परत येत होते. काष्टी येथील मातोश्री हॉटेजवळ रात्री एक वाजता लघुशंकेसाठी थांबले असता चार जणांना त्यांना घेरले आणि धारधार शस्त्राचा धाक दाखवून खिशातील रोग तीस हजार रुपये, पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन आणि चारचाकी गाडी असा एकून चार लाखांचा माल लंपास केला. ननवरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करत आहेत.