एटीएममध्ये केली हातचलाखी; मदतीच्या नावाने केली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मदत करण्याचा बहाणा करून एटीएम कार्डची अदलाबदल करून 49 हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना कांदिवली येथे घडली. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

गेल्या आठवडय़ात ते लालजी पाडा परिसरातील एका एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले होते तेव्हा एटीएममध्ये एकजण उभा होता. तक्रारदारांना पैसे काढताना तांत्रिक अडचणी येत होत्या. याचाच फायदा त्या भामटय़ाने घेतला. त्याने तक्रारदाराचा पिन नंबर पहिला. हातचलाखी करून भामटय़ाने तक्रारदाराच्या कार्डची अदलाबदली करून कार्डमधून 25 हजार रुपये काढले. तसेच 24 हजार रुपयांचा ऑनलाइन व्यवहार केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांनी सांगितले.