परदेशात नोकरीच्या नावाने फसवणूक करणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडा येथे नोकरी लावतो असे सांगून प्रोसेस फीच्या नावाखाली बेरोजगार तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सुधीर खैरे असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.  त्याच्या इतर साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार हे कांदिवली येथे राहत असून पूर्वी ते कॉल सेंटरमध्ये काम करायचे. नोकरी गेल्याने ते नव्या नोकरीच्या शोधात होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी कॅनडा येथील फूड इंडस्ट्रीजमध्ये मोठय़ा प्रमाणात भरती सुरू असल्याची एक जाहिरात वाचली होती. ती जाहिरात वाचून त्याने संबंधित कंपनीत अर्ज केला होता. अर्ज केल्यावर सुमितने तक्रारदाराला संपर्क साधला. नोकरीसाठी प्रोसेस फी म्हणून दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. नोकरी मिळणार म्हणून तक्रारदाराने पैसे भरले. पैसे भरूनही नोकरीबाबत सुमित काही सांगत नव्हता. वारंवार संपर्क साधला असता सुमित टाळाटाळ करायचा. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सुमितला पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.