Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा ‘8 एप्रिल’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Saturday, April 8, 2023)
आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही असेल. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. अडचणी लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न कराल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Saturday, April 8, 2023)
महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी इतरांचे मत विचारात घ्याल. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न कराल. नव्या मित्रमैत्रिणींची ओळख होईल. आहारात गुळाचा समावेश करा. मिळालेल्या रिकाम्या वेळाचा सदुपयोग कराल.
शुभरंग : पांढरा

मिथुन (GEMINI – Saturday, April 8, 2023)
जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यालयात सावधगिरी बाळगा. मिळालेली संधी सोडू नका. खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. रिकामा वेळ आवडते पुस्तक वाचण्यात घालवाल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : लाल

कर्क (CANCER – Saturday, April 8, 2023)
कुटुंबियांना वेळ द्याल. नवीन कपडे खरेदी कराल. जुन्या आठवणीत रमाल. घराबाहेर जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आहाराकडे लक्ष द्या. रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश करा. बारीकसारिक गोष्टी मनाला लावून घेऊ नका.
शुभरंग : हिरवा

सिंह (LEO – Saturday, April 8, 2023)
पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. नवी केशरचना कराल. सौंदर्याची काळजी घ्याल. झोपताना चटईचा वापर करा. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कलेतील कौशल्य वाढीस लागेल.
शुभरंग : नारिंगी

कन्या (VIRGO – Saturday, April 8, 2023)
जास्त चिंता करू नका. कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. कामात कोणतीही दिरंगाई करू नका. घरगुती समस्यांमुळे मन थोडे गोंधळात राहील. वादविवादापासून लांब राहाल. आईवडिलांचे म्हणणे ऐका.
शुभरंग : जांभळा

तूळ (TULA- Saturday, April 8, 2023)
स्वप्नं बघून यश मिळत नाही. विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागेल. वाचनासोबत लिखाणावरही जोर द्या. परस्परांमधील स्नेहभाव वाढवा. कौटुंबिक कटकटी वाढू देऊ नका. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या. गोड बालून कामे करून घ्या.
शुभरंग : चॉकलेटी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, April 8, 2023)
संशयी वृत्तीस आळा घाला. पथ्य पाळा. इतरांना सकारात्मक करण्यास पुढाकार घ्याल. खुल्या दिलाने नव्या ओळखी करून घ्याल. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. मानसिक संतुलन टिकवून ठेवा. पैशाचा काटकसरीने वापर करा. कुणालाही पैसे उधार देऊ नका.
शुभरंग : किरमिजी

धनु (SAGITTARIUS – Saturday, April 8, 2023)
स्वत:चा उत्कर्ष करून घ्या. स्वार्थी लोकांपासून सावध राहा. क्षेत्र कोणतेही असो ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. कामात सतर्क राहा. इतरांशी सल्ला मसलत कराल. रागावर नियंत्रण ठेवा. आपली जबाबदारी ओळखून वागा
शुभरंग : सोनेरी

मकर ( CAPRICORN – Saturday, April 8, 2023)
स्वत:चा उत्कर्ष करून घ्या. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळझी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोडीदाराचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्याल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Saturday, April 8, 2023)
ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. इतरांना सल्ले देणे टाळा. यशाच्या मोठ्या अपेक्षांकरिता प्रयत्नशील राहाल. योजलेली कामे करताना जिद्द ठेवावी लागेल. कुटुंबात वातावरण आनंदी असेल. मौन पाळा.
शुभरंग : निळा

मीन (PISCES – Saturday, April 8, 2023)
मोठे कार्य हाती येण्याची शक्यता आहे. घरगुती वादाचे प्रसंग टाळा. शुध शुद्ध सात्त्विक आहार घ्या. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न कराला. इतरांवर विश्वास न ठेवता काम करा. कोणत्याही गोष्टी अतिरेक टाळा.
शुभरंग : आकाशी