Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’23 मे’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, May 23, 2023)
सकारात्मक विचार करा. कुमारिकांना खीर खाऊ घाला. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळेल. खोळंबलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. वरिष्ठांची मर्जी राखा. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. स्वत:साठी वेळ द्या.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, May 23, 2023)
लहान मुलांबरोबर खेळा. गरजवंताला मदत करा. मोकळा वेळ घराच्या सुशोभिकरणासाठी द्याल. आरोग्याची काळजी घ्या. आवडत्या पुस्तकाचे वाचन करा. तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Tuesday, May 23, 2023)
घरात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार केलेले शो पीस ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीत सहकाऱ्यांसोबत कामानिमित्त वेळ घालवाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमध्ये गुंतवणूक कराल. आहारात गुळाचा समावेश करावा.
शुभरंग : निळा

कर्क (CANCER – Tuesday, May 23, 2023)
झोपताना एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराजवळील झाडाच्या मुळांना हे पाणी घाला. लोकं तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. घरातील व्यक्तिंना वेळ द्या. जोडीदारासोबत सायंकाळी फिरायला जाल. सकाळी तुळशीला पाणी घाला.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO -Tuesday, May 23, 2023)
जेवणात लाल मिरचीचा वापर करा. इतरांच्या गरजा समजून घ्या. कार्यालयातून लवकर घरी जाण्याची संधी मिळेल. आजचा दिवस आनंदाचा आहे. फिरायला जाण्याचा प्लान आखाल. विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. मन मारून राहू नका. झोपताना चटईचा वापर करा.
शुभरंग : खाकी

कन्या (VIRGO – Tuesday, May 23, 2023)
तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या. आज तब्येत चांगली राहील. सकाळी व्यायामाकरिता वेळ काढाल. पैशाची बचत करावी लागेल. कोणी मदत करेल अशी अपेक्षा बाळगू नका. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : खाकी

तूळ (LIBRA-Tuesday, May 23, 2023)
सोन्याची अंगठी बोटात घाला. प्रियकराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. महत्त्वाचे आर्थिक करार आज होण्याची शक्यता आहे. आज एका अति सुंदर व्यक्तिशी भेट होईल. केलेल्या मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल.
शुभरंग : चॉकलेटी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, May 23, 2023)
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. अतिमधुर आणि सुंदर आवाजाच्या व्यक्तिशी भेट होईल. मेहनतीचे चीज होईल. योग्य ठिकाणी मौन पाळलेले बरे. व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यावर भर द्याल. घरातील फुलदाणीत सुगंधी फुले ठेवा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन कराल.
शुभरंग : चॉकलेटी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, May 23, 2023)
कुणाचाही अनादर करू नका. प्रिय व्यक्तिंसोबत छोट्या सुट्टीचे आयोजन कराल. लॅपटॉप, टीव्ही अशा तांत्रिक वस्तू वेळीच दुरुस्त करून घ्या. सिनेमा पाहण्यात किमती वेळ घालवू नका. शालेय मुलामुलींना स्टेशनरी देऊन मदत करा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : काळा

मकर ( CAPRICORN -Tuesday, May 23, 2023)
सूर्योदयाच्या वेळी 15 ते 20 मिनिटे सूर्य स्नान करा. आजार दूर होतील. घरातील लहान मुलांबरोबर अधिकाधिक वेळ घालवाल. प्रलंबित कामे पूर्ण कराल. घराच्या अंगणात मोगऱ्याचे झाड लावा.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS -Tuesday, May 23, 2023)
करमणुकीचे कार्यक्रम पाहाल. नातेसंबंध नव्याने दृढ होण्याचा आजचा दिवस आहे. प्रिय व्यक्तिला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आध्यात्मिक गुरुंच्या दर्शनाला जाल. नव्या कलेचे ज्ञान मिळवाल. आवडीचे संगीत ऐकण्यात वेळ घालवाल. कलेचा योग्य ठिकाणी वापर कराल.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Tuesday, May 23, 2023)
प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. सायंकाळी जोडीदारासोबत फिरायला जाल. मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. वाणसामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. पारिजातकाचे झाड अंगणात लावा.
शुभरंग : जांभळा