सन्मान स्वातंत्र्यसैनिकांचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते 9 ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी सन्मान होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांची केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी महाराष्ट्र सदन येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, अचलपूरचे आमदार बच्चू कडू, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित होते. ‘भारत छोडो आंदोलन’ आणि ‘गोवामुक्ती’ संग्रामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल भिवाजी अंबुले (भंडारा), रतनचंद जैन (नागपूर), माधवराव कुलकर्णी (परभणी), लक्ष्मण उखडे (संभाजीनगर), शिवलिंगप्पा इराप्पा (लातूर), गणेश बाजपेयी (वर्धा), बन्सी जाधव (बीड) या स्वातंत्र्यसैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.