अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ करणे नव्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे पंतप्रधानांना शिवीगाळ करणे नव्हे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने बजावतानाच फेसबुक पोस्टमुळे अटकेची कारवाई झालेल्या आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच मुलभूत अधिकाराखाली नागरिकाला मिळणारे अभिव्यक्तिस्वातंत्र आणि मर्यादा याकडेही लक्ष वेधले. मुमताज मन्सुरी या व्यक्तीने फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुमताजला अटक केली आहे. सदरचा गुन्हा रद्द करावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.