
बेकायदा बंदुकीतून गोळी सुटून मित्राचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला न्यायालयाने साडेचार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. राजू शिद असे या आरोपीचे नाव असून तो त्याचा मित्र गणपत शिद याच्यासोबत
जंगलात शिकारीला गेला होता. दरम्यान, गोळी लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन गणपतचा मृत्यू झाला होता. रोह्यातील इंदरदेव आदिवासी वाडीत राहणारे राजू शिद व गणपत शिद हे कार्ली जंगलात शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी राजूजवळील ठासणीच्या बंदुकीतून सुटलेली गोळी लागून गणपतचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रोहा पोलिसांनी राजूला बेड्या ठोकत माणगाव-रायगड अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सबळ पुराव्यांच्या आधारे राजू याला दोषी ठरवत एक हजारांचा दंड व कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.




























































