श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आदिवासींना दिवाळी निमित्त कापड, मिष्ठान्नाचे वाटप

131

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

बुलढाणा व नाशिक जिल्ह्यांतील ५० हजार आदिवासींना त्यांच्या पाड्या-वाड्यावर जाऊन शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आदिवासींना दिवाळी निमित्त कापड, मिष्ठान्नाचे वाटप दिवाळीपूर्वीच करण्यात आले आहे. भारतातील सर्वसामान्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात अशा एकूण ४२ सेवा योजना कार्यरत आहे.

buldhana-tribal

भाविकांनी दिलेल्या दानाचा सदुपयोग करुन त्यातूनच आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद फुलावा व त्यांची सहकुटूंब दिवाळी साजरी व्हावी म्हणून श्री संस्थानद्वारा गत ३६ वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यांतील मध्यप्रदेश सीमावर्ती भागात वसाली, अंबाबरवा, चुनखडी, शेंबा, मांगेरी, भिंगारा, चाळीसटपरी, गहुमार या आदिवासी भागात तसेच नाशिक नजीक श्री क्षेत्र पंपासरोवर, कपीलधारा ता. इगतपुरी या क्षेत्री पुरुष, महिला, लहान-मोठे मुले व मुली यांना वयोगटानुसार एकूण ५० हजाराचे वर आदिवासी बांधवांना धोतर, शर्ट, पायजामा, साडी, लुगडे, पंजाबी ड्रेस इत्यादी श्री संस्थेद्वारा या आदिवासी भागातील भागातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण करुन महिला, पुरुष, मुले, मुली या प्रत्येकांचे वयोगटानुसार दिवाळी अगोदरच मिष्ठान्नासह कापडप्रसादाचे वितरण करण्यात आले.

महंत श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, श्री स्वामी केशवानंद सरस्वती महाराज, आनंद आखाडा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच संस्थानचे विश्वस्त व सेवाधारी यांनी तेथे जाऊन, त्या-त्या भागात मिष्ठान्नासह कापडप्रसादाचे वितरण केले.

आपली प्रतिक्रिया द्या