कुख्यात गजाजन मारणे विरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई, येरवडा कारागृहात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गजानन पंढरीनाथ मारणे याने नागरिकांमध्ये दशहत पसरवून सहा गुन्हे केले होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. कारवाईच्या भीतीने गजानन मारणे फरार झाला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी काल सातारा पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळून तीन साथीदारांसह ताब्यात घेतले. त्यानुसार त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

कुख्यात गजानन मारणे याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, दरोड्याची तयारी असे 22 गुन्हे दाखल आहेत. तळोजा कारागृहातून तो 15 जानेवारीला बाहेर आला होता. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने सहा गुन्हे केले होते. याप्रकरणी एमपीडीए अ‍ॅक्टनुसार त्याच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २ मार्चला त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. कारवाईच्या भीतीमुळे मारणे फरार झाला होता. मात्र, काल रात्री पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांनी कुख्यात गजानन मारणेसह तिघांना अटक केले. त्यानंतर त्याला आज येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, शिवाजी ननवरे, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, सचिन गायकवाड, नीलेश कदम, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, दीपक साबळे, विक्रमसिंह तापकीर यांच्या पथकाने केली.