
गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रात्री फिरतात. त्यांची सोय व्हावी म्हणून मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 ते 27 सप्टेंबरदरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत, तर विसर्जनाच्या दिवशी पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये विसर्जनाच्या खर्च करून दिवशी पहाटे पुण्यातील गणेश मंडळ दोनपर्यंत जिवंत देखावे धावणार आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारत असतात. हे सगळे देखावे शहराच्या उपनगरासह राज्याच्या कानाकोपयातून नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात येत असतात. देखावे रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे नागरिकांना बन्याच वेळा घरी जाण्यासाठी खासगी कॅब किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. यात बऱ्याच वेळा नागरिकांची आर्थिक लूट होण्याची शक्यता असते. आता यंदापासून मेट्रोची सेवा सुरू झाली आहे.
गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावते. दुपारच्या वेळी प्रवाशांची संख्या कमी असते, त्यावेळी मेट्रोची फेरी 15 मिनिटांच्या अंतराने होते. गणेशोत्सवाच्या काळात तर पीएमपीनेदेखील रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे, आता मेट्रोदेखील रात्री 12 पर्यंत धावणार असल्याने प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना न करता फिरता येणार आहे.
























































