
सराईत मोटार सायकल चोरांची टोळी पारनेर पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांच्याकडून 19 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी शुभम अविनाश महांडुळे (23, रा. सारोव्य आडवाई, ता. पारनेर जि. नगर), रोहित फुलचंद भालशंकर (19, रा. सिंहगडरोड, दांडेकर पुल 133,पुणे ह. रा. सारोळा आडवाई ता. पारनेर जि. नगर), ओंकार रोहीदास महांडुळे ( 20, रा. सारोळा आडवाई ता. पारनेर जि. नगर), साहिल गफूर पठाण (20, रा. सारोळा आडवाई ता. पारनेर जि. नगर) यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे.
जामगाव (ता. पारनेर जि.नगर) येथील तक्रारदार सुमित राजेंद्र नाईक यांच्या घरासमोर लावलेली त्यांची बजाज पल्सर मोटार सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयीतांना यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरवातीला माहिती देण्यास नकार दिला. मात्र, विश्वासात घेत त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. त्यांनी अटक केली असून त्यांचे दोन फरार असलेल्या साथीदारांचे नावे मिळाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींकडून 19 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 4 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे सारे, उप विभागीय पोलीस अधिकारी न.ग्रा.वि.अ. नगर अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे सुचने प्रमाणे, शिवाजी कदम ,जालिंदर लोंढे ,आप्पासाहेब डमाळे, सुधीर खाडे, गहिनीनाथ यादव, गोवर्धन जवरे, निलेश आंधळे, सुरज कदम, सत्यम शिंदे, अमोल जाधव सर्व नेम पारनेर पोस्टे यांचे पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास शिवाजी कदम हे करत आहेत. पारनेर पोलीस ठाण्याच्या हददीत अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य कोणी करीत असल्यास तात्काळ पोलीसांना खबर दयावी खबर देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे अवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जनतेला केले आहे.
























































