विनाअनुदानित गॅस सिलिंडर 62 रुपयांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

विनाअनुदानित गॅस सिलिंडर तब्बल 62.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.  गुरुवारपासून नवीन दर लागू झाले. इंडेन कंपनीच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 546.50 रुपये इतकी झाली असून यापूर्वी ही किंमत 608.50 रुपये इतकी होती. जुलैमध्येही या गॅस सिलिंडरची किंमत 100.50 रुपयांनी कमी करण्यात आली होती. अशाप्रकारे दोन महिन्यांत या गॅस सिलिंडरची किंमत 163 रुपयांनी घटली आहे. दरम्यान, वर्षाला 12 सिलिंडर अनुदानित तत्त्वावर मिळतात.