
लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याची सर्वांनाचा उत्सुकता होती. अखेर प्रवीण तरडे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आणला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. गश्मीर महाजनीने देखील सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.




























































