गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेळगाव

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. सागर लाले असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला बेळगावमधून ताब्यात घेण्यात आले होते. बंगळुरू एसआयटीच्या पथकाने केलेल्या चौकशी दरम्यान त्याचे नावे समोर आले होते.

सागर लाले यांने गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पुढील तपासात आणखी काही जण हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.