
टीम इंडियाचा माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला देण्यात आलेले जीवे मारण्याच्या धमकीचे ई-मेल पाकिस्तानातूनच आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गौतम गंभीरने आरोप केला होता की त्याला इसिस कश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी ऍड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे. दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. त्या मेलचा पाकिस्तानी आयपी ऍड्रेसही सापडला आहे



























































